---Advertisement---
बातम्या

निकालापूर्वीच रोहिणी खडसेंनी सोडले मतमोजणी केंद्र

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीची मतमोजणी जळगावातील सत्यवल्लभ भवनमध्ये सुरू झालेली आहे. सध्याची आकडेवारी लक्षात घेता शेतकरी पॅनलचे बरेच उमेदवार आघाडीवर आहेत. विद्यमान अध्यक्षा मंदाताई खडसे विरुद्ध आ.मंगेश चव्हाण या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

rohini khadse 1 jpg webp webp

मतमोजणी सुरू असून निकाल जाहीर होण्यापूर्वीच आ.एकनाथराव खडसे यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी मतमोजणी केंद्र सोडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

---Advertisement---

हे देखील वाचा : दूध संघ निवडणुक : सुरुवातीलाच महाजनांनी दिला खडसेंना धक्का

जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते.

या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानानंतर दोन्ही पॅनलनी विजयाचा दावा केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---