जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२३ | जळगाव संपूर्ण राज्यात हॉटसिटी म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात या जिल्ह्यात सुर्य आग ओकत असल्याने सर्वाधिक तापमानाची नोंद येथे होण्याचा विक्रम दरवर्षी कायम राहतो. मात्र यंदा जळगाव जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंदी झाली आहे. उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांचा जोर पुन्हा वाढल्याने जळगावचा तापमानाचा पारा ५ अंशांवर घसरला आहे. परिणामी राज्यात जळगाव शहराचे सर्वाधिक कमी तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे महाबळेश्वर पेक्षाही जळगाव कुल ठरले आहे. तब्बल २१ वर्षांनंतर जळगावला सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. जळगावसह धुळे, निफाडमध्ये राज्याचे हंगामातील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. Cold in Jalgaon
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट महाराष्ट्राकडे वळल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. उत्तर भारतातून येणार्या अतिथंड वारे महाराष्ट्रात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातून शिरत असल्याने या भागातील जिल्ह्यांमधील तापमानात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातात जळगावसह धुळे, निफाडमध्ये राज्याचे हंगामातील निचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव शहराचे तापमानात कमालीची घट गेल्या तीन-चार दिवसापासून झालेली आहे. येत्या ४८ तासांत, नंदुरबार, धुळे जळगाव, नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता आहे. यंदा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात नीचांकी पाच अंश तापमान नोंदवले गेले. जळगावात रविवारी १० अंश सेल्सिअसवर असलेला पारा सोमवारी अवघ्या पाच अंशांवर आला. मंगळवारीही पहाटेपासून गारठा कायम आहे. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच तापमानात एवढी घसरण झाली.
राज्यभरात नोंदविण्यात आलेले तापमान
सोमवारी (ता. ९) राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे २८.६ (८.६), जळगाव – (५), धुळे २७ (५), कोल्हापूर २८.८ (१५), महाबळेश्वर २३.५(११.५), नाशिक २६.८ (८.७), निफाड २६.३ (५), सांगली २८.८ (१३.१), सातारा २७.३(११.९), सोलापूर ३१.४ (१२), सांताक्रूझ ३२.८ (१९.४), डहाणू ३२.२ (१७.३), रत्नागिरी ३३.३ (१९.५), औरंगाबाद २८.८ (५.८), नांदेड – (१०.६), उस्मानाबाद – (८.५), परभणी २८.५ (९.५), अकोला ३०.५ (१०.४), अमरावती २९.२ (९.९), बुलडाणा २७ (१०), ब्रह्मपुरी २९ (१०.४), चंद्रपूर २६.६ (१०), गडचिरोली २३.४(९.६), गोंदिया २७.५(७), नागपूर २८.३ (८.५), वर्धा २८ (९.९), यवतमाळ २७.५ (८.५).