जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । रविवारची सुटी असतानाही महाविद्यालयात कामानिमित्ताने जात असल्याचे सांगून घरून गेलेल्या पतीला पत्नीने हॉटेलात प्रेयसी सोबत बसलेला पाहून पत्नीचा संताप अनावर झाला. यावेळी संताप अनावर झालेल्या पत्नीने दोघांनाही चोप देत पोलीस ठाण्यात हजर केले. या घटनेची जळगावात एकच चर्चा सुरू आहे.
नेमकी काय आहे प्रकार?
जळगाव शहरातील एका भागात रहिवासी तरुण शिरसोली रस्त्यावरील एका महाविद्यालयात नोकरीला आहे. रविवारची सुट्टी असतानाही तो महाविद्यालयात जायचे असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. यानंतर पती महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये प्रेयसीसोबत नाश्ता करत बसला होता. याबाबतची माहिती पत्नीला मिळाली. यानंतर पत्नीने तिच्या भावाला सोबत घेत थेट रेस्टॉरंट गाठले. तिथे पती प्रेयसीसोबत नाश्ता करत होता. हे पाहून संतापलेल्या पत्नीने पतीसह त्याच्या प्रेयसीच्या कानशिलात लगावली. या घटनेने भर रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. तिथे गेल्यावर पतीच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड तिने केला.
पोलीस ठाण्यात पती-पत्नी आणि ती असे तिघांचे म्हणणे ऐकून घेत प्रेयसीच्या आई-वडिलांनाही पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले. प्रेयसीला तिच्या आई वडिलांच्या, तर प्रियकराला मेहुण्याच्या ताब्यात देण्यात आले. या घटने संदर्भात पत्नीने पती व प्रेयसीविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.