---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

अत्यंत दुर्दैवी! अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावच्या जीआरपी पोलीसाचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच अज्ञात वाहनाने जोरदार धडकेत दुचाकीस्वार जीआरपी पोलीसांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी वावडदा ते म्हसावद दरम्यान घडली. दिपक जयसिंग बाविस्कर (वय-३२) रा. म्हसावद ता.जि.जळगाव असे मयताचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp webp

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रहिवाशी दिपक बाविस्कर हे आईवडील, पत्नी व तीन वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला असून ते जीआरपी पोलीसात नोकरीला आहे. दिपक बाविस्कर हे कामाच्या निमित्ताने दुचाकीने वावडदा येथे गेला होता. काम आटोपून परत घरी येत असतांना वावडदा ते म्हसावद दरम्यान असलेल्या कुरकुरे नाल्याजवळून जात असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.

---Advertisement---

या अपघातात दिपकचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार काही वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई रेखा, वडील जयसिंग बाविस्कर, पत्नी माधुरी आणि तीन वर्षाची मुलगी पुर्वी असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---