ऐन गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर ग्राहकांना झटका; जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ!

मे 21, 2026 1:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२६ । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज गुरुपुष्यामृत योग सारखा मोठा आणि शुभ मुहूर्त असतानाच, जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आजच्या या भाववाढीमुळे सणासुदीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी निघालेल्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

gold silver

काय आहेत भाव?

जळगावच्या सराफ बाजारपेठेत आज सोन्याच्या भावात १ हजार रुपयांची, तर चांदीच्या भावात थेट २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 62 हजार 225 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह सह 2 लाख 78 हजार 100 रुपयांवर गेले.

सुवर्ण व्यवसायिकांच्या मते, अमेरिकेने इराणला युद्धासंदर्भात तडजोड करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध थांबण्याच्या दृष्टीने झालेल्या या मोठ्या घडामोडीचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेसह भारतीय सराफा बाजारावर झाला असून सोन्या-चांदीचे दर वधारले आहेत.

मुहूर्ताच्या खरेदीवर किमतीचा परिणाम
आज गुरुपुष्यामृत योग असल्याने हिंदू परंपरेनुसार सोने आणि चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आज सकाळपासूनच जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. मात्र, ऐन मुहूर्ताच्या दिवशीच सोन्या-चांदीच्या किमती वाढल्याने ग्राहकांना आता खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे. जागतिक युद्धाच्या घडामोडींवरून आगामी काळातही हे भाव असेच अस्थिर राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now