---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या वाणिज्य

Gold Rate : जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याची झळाळी उतरली, आताचे नवीनतम दर तपासून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । जर तुम्ही सोने (Gold Rate) खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु वाढत्या किमतींमुळे ते थांबवले असेल, तर आता तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण झाली. सोबतच चांदीही घसरली आहे. आजचे सोन्याचा नवीनतम दर काय आहे ते जाणून घ्या? Gold Silver Rate Today

GS16 May

किती आहे आता भाव?
गुरुवारी २२ कॅरेट सोन्याचा दर १२०० रुपयांनी घसरून ८५,०७० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. तर २४ कॅरेट सोन्याचा दर १३०० रुपयांनी घसरून ९२८०० (जीएसटीसह ९५५८४) रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आले;तर चांदीच्या दरातही २ हजारांची घसरण झाली आहे. यांनतर आता चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ९६००० रुपयापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारानंतर भारतातील सोन्याच्या किमतीत घट झाली असल्याचं माहिती समोर आलीय.

---Advertisement---

खरंतर रविवारी (११ मे) ९६८०० रुपयावर असलेला सोन्याचा दर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ३००० रुपयांनी घसरून ९३८०० (विनाजीएसटी)रुपये प्रति तोळ्यावर आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी १००० रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर ९४८०० रुपयावर पोहोचला. मात्र त्यांनतर बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवस सोने दरात मोठी घसरण झाली. गेल्या दोन दिवसात सोने दरात तब्बल २००० रुपयांची घसरण झाली. यामुळे आज सकाळच्या सत्रात सोन्याचा तोळा ९२८०० रुपयावर पोहोचला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment