⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

आठवड्याभरात सोने 2600 रुपयांनी महागले, जळगावातील आजचा प्रति तोळ्याचा भाव पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । मार्च महिन्यात सोन्याने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले. लग्नसराईच्या काळात सोन्याचा भाव वाढल्याने ग्राहकांना जबरदस्त झटका मिळाला आहे. गेल्या सात दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे २६०० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे जळगावात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ६५,७०० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीतही वाढ पाहायला मिळत आहे. Gold Silver Rate 9 March 2024

आंतरराष्ट्रीय जगतातीला घडामोडींमुळे सोन्याच्या दरात कमालीची वाढ झालीय. १ मार्च रोजी सोन्याचे दर ६३१०० रुपये प्रतितोळा होते. ते शुक्रवारी ६५,७०० रुपयांवर पोहचले आहे. यापूर्वी दोनदा एक-एक हजाराने सोन्याच्या दरात वाढ होवून सात दिवसात ही वाढ २६०० रुपयांनी झाली आहे, मात्र, दोन दिवसांत भाव घसरण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे शुक्रवारी एका दिवसात चांदीचा दर ५०० रुपयांनी वाढला आहे.यामुळे आता जळगावात सध्या चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७४००० रुपयावर पोहोचला आहे.

सोने दर पुन्हा घसरणार?
सोन्याच्या दरवाडी मागे अमेरिकेतील फेडरलसह अन्य दोन बँकांमधील अडचणीचा परिणाम है कारण असल्याचे सांगितले जाते आहे. परंतु आता या दोन्ही बँका अडचणीच्या स्थितीतून सावरण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली जात असल्याने सोन्याचे दर पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. हे दर एक ते दीड हजार रुपयांनी घसरू शकतील असा सराफ बाजाराचा अभ्यास असलेल्या जाणकारांचा अंदाज आहे