Gold Rate : बजेटपूर्वी ग्राहकांना दिलासा ; सोन्याचे भाव पुन्हा कोसळला, तपासून घ्या आताचे जळगावातील भाव..

जानेवारी 29, 2025 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२५ । येत्या १ तारखेला देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) मांडला जाणार असून यात काय स्वस्त अन् काय महाग होणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागून आहे. दरम्यान गेल्या दोन आठवड्यात महागाईचे तोरण बांधणाऱ्या सोने (Gold Rate) आणि चांदीने (Silver Rate) बजेटपूवी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

gold jpg webp

गेल्या दोन आठवड्यात सोने दराने महागाईचा झेंडा लावला. चांदीदेखील महागली होती. या काळात सोने ३००० रुपयांनी तर चांदी हजार रुपयांनी महागली होती. पण या सोमवार-मंगळवारी दोन्ही धातुत घसरण झाली. जळगावच्या सराफ बाजारात सोने दरात २०० रुपयांना घसरले असून यामुळे आता २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर विनाजीएसटी ८०,६०० रुपये इतके आहे.

दुसरीकडे चांदी मात्र, गेल्या आठवड्यात ९३ हजार रुपये किलोवर स्थिरावली होती. सोमवारी चांदीचे दर एक हजार रुपयांनी घसरून ९२ हजार रुपये झाले. मंगळवारी हेच दर कायम होते. दरम्यान ही घसरण सामान्य असल्याचे जाणकार सांगतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now