Gold Rate ! जळगावमध्ये सोन्याचा भाव 1700 रुपयांनी घसरला, आता 1 तोळ्यासाठी ‘इतके’ रुपये मोजवे लागणार?

जुलै 25, 2025 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२५ । जळगावच्या सराफ बाजारात मागच्या काही दिवसात सोने आणि चांदी दरात वाढ झाल्याने दोन्ही धातूंनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला. सोन्याचा दर विनाजीएसटी १ लाखाच्यावर तर चांदीने देखील १२०००० रुपयापर्यंत पोहोचली. मात्र सोने आणि चांदी दरवाढीला गुरुवारी ब्रेक लागला आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केवेळ सोनेच नाही तर चांदीही स्वस्त झाली आहे.

gold silver jpg webp

विशेष गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याच दिवशी दोन्ही धातूंच्या दरात घसरण झाली. सध्या पावसाळा सुरू असल्याने आता जरी लग्नाचे मुहूर्त नसले तरी सोने खरेदीसाठी ग्राहकांची सुवर्ण बाजारात गर्दी झालेली होती.

गुरुवारी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर ९९१०० (जीएसटीसह जीएसटीसह १ लाख दोन हजार) रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह १ लाख १८ हजार ५०० रुपये होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now