जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२४ । एकीकडे भारतीय शेअर मार्केट कोसळत असून दुसरीकडे सोने आणि चांदीचे दर देखील घसरले. गेल्या पाच दिवसांपासून सुवर्ण बाजारात चांदीचे दर प्रति किलो ९१ हजार रुपये होते. मात्र, शेअर बाजार तसेच आंतराष्ट्रीय बाजारात झालेल्या चढ उतारामुळे चांदीच्या भावात गुरुवारी तब्बल ४ हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे जळगावच्या सुवर्णपेठेत आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात चांदी ८७ हजार रुपये प्रति किलोवर स्थिरावली. तर सोन्याच्या भावातदेखील २५० रुपयांची घसरण झाली आहे.
दिवाळी सणामध्ये सुवर्ण बाजारात तेजी होती. लग्नसराईमध्ये सुवर्ण बाजारात तेजी असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्रोणाऱ्या बदलामले सोने व चांदीच्या भावातदेखील चढ-उतार होत आहे. यात मागील आठवड्यात ७७ हजार रुपये प्रति तोळे असलेल्या सोन्याच्या भावात सतत घसरण होत गेली.
बुधवारी सोने ७६ हजार ७५० रुपये तोळा होता. गुरुवारी सोने ७६ हजार ५०० रुपये झाल्याने २५० रुपयांची घसरण झाली होती, तर ९१ हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी चार हजार रुपयांनी कमी होऊन ८७ हजार रुपये यालेली होती.
दरम्यान,अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याज कपाती संदर्भातील कठोर भूमिकेचा परिणाम शेअर बाजार, चलन बाजार अन् सोने चांदीच्या दरावर झाल्याचं पाहायला मिळालं.