⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

दोनच दिवसात सोनं 1200 रुपयांने महागले ; आता जळगावात एका तोळ्यासाठी मोजावे लागतंय इतके रुपये..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव न्यूज | 17 एप्रिल 2024 | जागतिक नकाशावर अजून एका युद्धाचे सावट दिसत आहेत. इराण आणि इस्त्राईलमध्ये सुरु असलेल्या ताणतणावाचे परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहेत. जागतिक गुंतवणूकदारांनी त्यांचा मोर्चा सोने-चांदीतील गुंतवणुकीकडे वळवला आहे. या सर्व परिस्थितीचे चटके ग्राहकांना सहन करावे लागत आहेत. जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने जीएसटीसह 75 हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहेत. तर चांदीचा दरही 83 हजार रुपयावर गेला आहे.

पहिल्या पंधरवाड्यात दरवाढीचा आलेख उंचावला होता. दुसऱ्या पंधरवाड्यातही मौल्यवान धातूंची घौडदौड सुरुच आहे. एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने तुफान खेळी खेळली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या आठवड्यातील दोन दिवसांत सोने दरात 1200 रुपयांची वाढ झाली आहे.

त्यामुळे जळगावात आता सोन्याचा भाव ७३ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. तर जीएसटीसह सोन्याचा तोळ्याचा दर ७५ हजार ९११ रुपयावर गेला आहे. दुसरीकडे, चांदीच्या भावात मात्र २०० रुपयांची घसरण होऊन ती ८३ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आली.