जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे सोने दरात वाढ दिसून आली. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्यामुळे सोन्याच्या किमती आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गडगडलेल्या दिसल्या. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

goodreturns संकेतस्थळावर जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २२ कॅरेट सोनं १६५० रूपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे प्रतितोळा सोन्याची किंमत ८८,९५० रूपये इतकी झाली आहे. २४ कॅरेटच्या सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. एक तोळा सोनं १८०० रूपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे आज सोमवारी सराफा बाजारात २४ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ९६,८८० रूपये इतकी झाली आहे.
चांदीची किमतही घसरली
आज सोन्यासह चांदीच्या किमतीत देखील घसरण झाली. आज चांदीची किंमत ११० रूपयांनी घसरली आहे. यानंतर एक किलो चांदीची किंमत ९७९०० रूपये इतकी झाली आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील तब्बल 9 दहशतवादी तळ उडविले. दुसरीकडे या कारवाईनंतर सोन्याच्या किमतींनी थेट आभाळ गाठलं होते. सोन्याचा दर पुन्हा जीएसटीसह एक लाखाच्यावर गेले होते. मात्र आता युद्धविराम झाल्यानंतर सोन्याचे दर गडगडले आहे