जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२५ । इराण-इस्त्रायल युद्धामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी दिसून आली आहे. चांदीने सार्वकालीन उच्चांक गाठला आहे. दरम्यान, दोन दिवसात दोन हजार ५०० रुपयांची वाढ झालेल्या चांदीच्या भावात गुरुवारी एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी पुन्हा एक लाख आठ हजार ५०० रुपयांवर आली. सोन्याच्या भावातही २०० रुपयांची घसरण होऊन ते ९९ हजार ३०० रुपयांवर आले.

१४ ते १६ जून दरम्यान एक लाख सात हजार ५०० रुपयांवर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात १७ जून रोजी एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख आठ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. १८ जून रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी एक लाख १० हजार रुपयांवर पोहोचली. मात्र १९ जून रोजी त्यात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन चांदी एक लाख आठ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.








