जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२४ । सोने आणि चांदीच्या किमतीने या आठवड्यात ग्राहकांना दिलासा दिला आहे. दोन दिवसानंतर गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. यामुळे बाजारपेठेत चैतन्य आहे.गणेशोत्सवाची तयारी सुरु असून खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे.मौल्यवान धातूच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून नरमाई आली आहे. आता सोने आणि चांदीचा भाव काय आहेत? ते जाणून घ्या..
खरंतर जुलै महिन्याच्या अखेरीस सोन्याचे दर ७५ हजारावरून घसरून ६९ हजाराच्या घरात आले होते. तर चांदीही घसरून चार महिन्याच्या नीच्चांकीवर आले होते. यामागील कारण म्हणजेच केंद्र सरकारने सोन्या-चांदीवरील सीमा शुल्कात कपात केल्यानंतर दर घसरले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात दर पुन्हा वाढून ७२ हजारावर गेले. १ सप्टेंबर रोजी सोन्याचा दर ७२,५०० रुपये प्रति तोळ्यावर होते. तर चांदी ८५००० रुपये प्रति किलो इतका होता. मात्र गेल्या चार दिवसात दरात घसरण दिसून आली. चांदी दरात देखील मोठी घसरण दिसून आली.
जळगावात काय आहेत भाव?
जळगाव सुवर्णपेठेत सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१०० रुपये प्रति तोळा इतका आहे. हा दर बुधवारी सकाळचं सत्रात ७२४०० रुपये इतका होता. दुसरीकडे चांदीचा दर ८३००० रुपये प्रति किलो इतका आहे. गेल्या चार दिवसात सोने दरात ३०० ते ४०० रुपयापर्यंतची घसरण झाली तर चांदी दरात तब्बल २००० रुपयापर्यंतची घसरण दिसून आली.
आता भारतात सणासुदीचे दिवस सुरु होती. यादरम्यान, अनेक ग्राहक दागिने खरेदी करत. यामुळे आगामी दिवसात सोन्याचे दर कमी होतात कि वाढणार? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.