⁠ 
[rank_math_breadcrumb]

कभी खुशी कभी गम..! घसरणीनंतर सोन्याचा भाव पुन्हा वधारला, जळगावात आज भाव काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२४ । या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी पडझड झाली. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. लग्नसराईत दोन्ही धातुच्या भावात घसरण झाल्याने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. आठवड्याच्या अखेरीस मात्र मौल्यवान धातुंनी दरवाढीचा तडका लावला. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीय. सोबतच चांदी देखील वधारली आहे.

शुक्रवारी सोने दरात प्रति तोळा ४०० रुपयाची वाढ झाली. यामुळे आज शनिवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७७,१०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहे. त्याचसोबत चांदी दरात प्रति किलो १ हजार रुपयाची वाढ झाली. यामुळे आता चांदीचा दर विनाजीएसटी ९१,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्यात ११०० रुपयांची घसरण दिसली. मंगळवारी पुन्हा १४०० रुपयांनी सोनं घसरले. सलग दोन दिवसात सोने दरात २६०० रुपयाची घसरण झाली होती. मात्र यानंतर सलग तीन दिवसात सोने ७०० रुपयांनी महागले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.