⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | सोन्याच्या किमतीत दिलासा नाहीच! आज जळगाव प्रति तोळ्याचा भाव काय?

सोन्याच्या किमतीत दिलासा नाहीच! आज जळगाव प्रति तोळ्याचा भाव काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । मागील गेल्या दोन आठवड्यात सोने दराने मोठी उसळी घेतली. खरंतर पितृपक्षात सोनं-चांदी खरेदी करणे वर्ज्य आहे. कारण या काळात पितरांचे स्मरण होत असल्याने खरेदी करणे टाळावे, असं मानलं जाते. परिणामी मागणी नसलायने दोन्ही धातूंचे दर कमी होताना दिसून येतात, मात्र यावेळी उलट झाले. यावेळी पितृपक्षातच सोन्याच्या दराने विक्रमी उसळी घेतली. सोबतच चांदी दरातही वाढ दिसून आली.

जळगावच्या सुवर्णपेठेत पहिल्यांदाच सोन्याचा दर विनाजीएसटी ७६ हजार रुपयांवर गेला. मात्र शुक्रवारी सोने दरात किंचित घसरण दिसून आली. यामुळे आज शनिवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७६५०० रुपयांवर आले. आगामी दसरा आणि दिवाळीपर्यंत सोन्याचा दर स्वस्त होणार कि महाग होणार? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

काय आहेत सोन्याचा दर?
या चालू आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास १४०० रुपयांहून अधिकची वाढ दिसून आली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर ७५१०० रुपयावर स्थिर होता. मात्र मंगळवार, आणि बुधवारी प्रत्येकी ५०० रुपयाची वाढ झाल्यानंतर सोन्याचा दर प्रति तोळा ७६१०० रुपयावर पोहोचले. यांनतर गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर सोने पुन्हा ५०० रुपयांनी महागलेले. मात्र काल शुक्रवारी सकाळी २०० रुपयांनी घसरले. दुपारनंतर पुन्हा शंभर रुपयांनी वाढून सोन्याचे दर प्रती तोळा ७६५०० रुपयांवर आले.

चांदीचा दर काय?
चांदीच्या दराबाबत बोलायचं तर या आठवड्यात चांदी दरात प्रति किलो २००० ते २५०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीचा प्रति किलोचा दर विनाजीएसटी ९०,००० रुपयांवर होता.पहिले दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर बुधवारी चांदी दरात २००० रुपयापर्यंतची वाढ झाली. त्यानंतर चांदीचे दर स्थिर दिसून आली. सध्या एक किलो चांदीचा दर ९२००० रुपयावर आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.