जळगाव जिल्हावाणिज्य

सोनं ७५ हजार रुपयांची पातळी गाठणार? जळगावात एकाच दिवसात मोठी वाढ, आजचा भाव पटकन तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज : २ एप्रिल २०२४ : सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीने सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घातली. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात सोने-चांदीतील तेजीने झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोमवारी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी ६९ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर ७५ हजार रुपयांची पातळी गाठेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी सोने खरेदी करण्याच्या बेतात असलेल्या सामान्य नागरिकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून आगामी काळात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचे दर वाढत आहेत.

काय आहे सोने चांदीचा दर :
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. सोने ९०० रुपयाने तर चांदी ५०० रुपयांनी महागली. यामुळे जळगावात सोन्याचे दर आता १० ग्रॅमसाठी ६९ हजार ४०० रुपये आणि जीएसटीसह ७१ हजार ४८२ रुपये झाले आहेत. तर चांदीचा दर ७६००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

दरम्यान, जळगावात गेल्या महिन्याभरात सोने ६३०० रुपयांनी वधारले आहे. १ मार्च २०२४ ला सोन्याचा दर ६३१०० रुपयावर होता. तो आता ६९४०० रुपयावर पोहोचला आहे.

दरम्यान, सोने खरेदीसाठी गुढीपाडवा हा शुभमुहूर्त समजला जातो. येत्या ९ एप्रिलला गुढीपाडवा आहे. त्यामुळे या मुहूर्तावर सोन्याचा भाव वाढणार, हे जवळपास निश्चित आहे. परंतु, सध्या ७० हजारांच्या आसपास असलेल्या सोन्याचा प्रतितोळा दर गुढीपाडव्यापर्यंत ७५ हजारांवर जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button