⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | सोने-चांदी दराने ग्राहकांना फोडला पुन्हा घाम ; जळगाव सुवर्णपेठेत असे आहेत भाव?

सोने-चांदी दराने ग्राहकांना फोडला पुन्हा घाम ; जळगाव सुवर्णपेठेत असे आहेत भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२४ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड चढउतार होत आहेत. मोदी 3.0 (केंद्रीय अर्थसंकल्प 2024)सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याच्या सरकारच्या घोषणेनंतर अचानक सोन्याचा भाव झपाट्याने घसरला आणि तो प्रति तोळा ६९ हजाराच्या घरात पोहोचला, परंतु ऑगस्टमध्ये पुन्हा वाढीचा ट्रेंड सुरू झाला. तर या महिन्यातील गेल्या आठवडयात तर सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली. यामुळे सोन्याचा भाव पुन्हा ७४ हजार रुपयावर गेला आहे. दुसरीकडे चांदी दर देखील वधारला. एकीकडे सणासुदीचे दर सुरु असतानाच दोन्ही धातूंनी उसळी घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

मागील दोन तीन दिवसात सोने दरात तब्बल १५०० रुपयाची वाढ झालीय. यामुळे आज सकाळच्या सत्रात सोन्याचा दर ७४,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदी दरात ५ हजार रुपयापर्यंतची वाढ झाली. यामुळे चांदीचा एक किलोचा ८९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच दर ७२,२०० रुपयावर होता. तो आठवड्याच्या अखेरीस वाढून ७४१०० रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा दर ८३००० रुपये होता. म्हणजेच गेल्या आठ दिवसात सोने दर तब्बल २१०० रुपयांनी वधारले आहे. तर चांदी दर ६ हजार रुपयांनी वाढला आहे.

दरवाढीचे कारण काय?
अमेरिकन अर्थव्यवस्था अधिकच डळमळत असल्याने बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याच्या शक्यतेने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत असल्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्यास सुवर्णव्यवसायिकांचं म्हणणं आहे. आगामी काळामध्ये सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.