⁠ 
रविवार, मे 5, 2024

गुढीपाडव्यापूर्वीच सोने-चांदी नव्या उच्चांकीवर ; जळगावच्या सुवर्णपेठेत आताचे भाव किती? तपासून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने मोठा पल्ला गाठला असून या दरवाढीने ग्राहकांचे डोळे मात्र पांढरे झाले. दरम्यान, दोन दिवसांवर गुढीपाडवा हा सण येऊन ठेपला असून साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या या सणानिमित्त ग्राहकांचा सोने-चांदी खरेदीसाठी मोठा कल असतो. मात्र गुढीपाडव्या पूर्वीच सोन्यासह चांदीच्या किमतीचे नव्या उच्चांकीवर पोहोचले आहेत.

जळगावच्या सुवर्णपेठेत शनिवार, ६ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात ८५० रुपयांची वाढ होऊन ते ७१ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले. चांदीच्याही भावात एकाच दिवसात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८० हजार ९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.

गेल्या महिन्यात केवळ सोन्याचे भाव वाढत असताना आता सोन्यासह चांदीच्याही भावात मोठी वाढ सुरू झाली असून दोघांमध्ये भाववाढीची सध्या स्पर्धा दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वीच गुरुवार, ४ एप्रिल रोजी सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर शुक्रवार, ५ एप्रिल रोजी त्यात २५० रुपयांची वाढ झाली व ते ७० हजार २५० रुपये प्रति तोळा झाले. शनिवारी ही वाढ कायम राहत त्यात पुन्हा ८५० रुपयांची वाढ झाली व सोन्याने ७१ हजारांचाही पल्ला ओलांडून ते ७१ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले.

दुसरीकडे गेल्या आठवड्यापासून भाववाढ सुरू झालेल्या चांदीच्याही भावात तीन दिवसांत मोठी वाढ झाली. गुरुवार, ४ एप्रिल रोजी ७९ हजार २०० रुपये प्रति किलोवर चांदी पोहोचली होती. शुक्रवार, ४ एप्रिल रोजी त्यात ५०० रुपयांची आणि शनिवार, ६ एप्रिल रोजी तर थेट एक हजार ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ८० हजार रुपयांच्या पुढे जात ८० हजार ९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. यापूर्वी अनेक वेळा चांदी ७७ व ७८ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली. मात्र, ४ एप्रिलला ७९ हजार व आता ६ एप्रिल रोजी ८० हजार हा चांदीचा मोठा

एक तोळे सोन्यासाठी ७३ हजारांपेक्षा जास्त मोजा
७१ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेल्या सोन्याची खरेदी करताना एक तोळा सोन्यासाठी जीएसटीसह ७३ हजार २३३ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, एक किलो चांदीसाठी जीएसटीसह ८३ हजार ३२७ रुपये मोजावे लागणार आहेत