---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

Gold Rate : बाईईई… जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचा तोळा अखेर लाखाच्या वर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२५ । एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना आता सोन्याचा तोळा लाखाच्या वर गेल्याने ग्राहकांना चांगलाच घाम फोडला आहे. मागील काही दिवसापासून सोन्याचा दर एक लाखावर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. अखेर तो आता खरा ठरला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सोमवारी दिवसभरात तीन वेळा वाढून एक लाखांचा टप्पा पार केला आहे. या दरवाढीचा परिणाम जळगाव सराफ बाजारावर काहीअंशी जाणवला. Gold Rate Today 22 April 2025

JL Gold

जळगाव सराफ बाजारात शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी (दि २१) सकाळी दरात ११०० रुपयांची वाढ झाली. यानंतर दुपारी व संध्याकाळी पुन्हा ५०० रुपयांनी वाढून सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ९७५०० (जीएसटीसह १००४२५) वर पोहोचले. हा ऐतिहासिक सर्वकालीन उच्चांकी दर ठरला. दुसरेकडे सोमवारी चांदी दरात देखील १००० रुपयांची वाढ झाली असून यामुळे प्रति किलोचा भाव आता विनाजीएसटी ९८००० रुपये इतका आहे.

---Advertisement---

आठवड्याभरात विनाजीएसटी सोने तब्बल ३७०० रुपयांना महागले
गेल्या आठवड्यात सोन्याचा दर विनाजीएसटी ९३८०० रुपये (जीएसटीसह ९६,६१४) इतका होता. मात्र यानंतर सोने दरात सातत्याने दरवाढ दिसून आली. अखेर काल सोमवारी सोन्याचा दर ९७५०० (जीएसटीसह १००४२५) वर पोहोचले. म्हणजेच आठवड्याभरात विनाजीएसटी सोने तब्बल ३७०० रुपयांना महागले. चांदीतही २००० रुपयापर्यंतची वाढ दिसून आली.

दरवाढीचे कारण काय?
कमकुवत डॉलर आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीत आपले पैसे गुंतवत आहेत परिणामी दोन्ही मौल्यवान धातूचे भाव आता गगनाला भिडले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment