---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या वाणिज्य

Gold Rate : जळगावच्या सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोने 3090 रुपयांनी घसरले, आता असे आहेत दर?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । सोने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजेच जळगावच्या सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी घसरण झाली. एकाच दिवसात सोने दरात तब्बल ३ हजार रुपयांहून अधिकची घसरण झाली. यामुळे रविवारी ९६८०० रुपयावर असलेला सोन्याचा दर ९३ हजाराच्या घरात आला.

gold silver

खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे सोन्याने मोठी भरारी घेतली होती. गेल्या मंगळवारी (६ मे) सोन्याचा दर जीएसटीसह १ लाखाच्यावर गेला होता. मात्र भारत आणि पाक मधील युद्धबंदीनंतर सराफ बाजारात मोठा बदल पाहायला मिळाला.

---Advertisement---

काल सोमवारी दिवसभरात सोन्याचे दर गडगडले. सोमवारी(१२ मे) सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत २२६६ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. यानंतर सायंकाळी सोन्याच्या किंमतीत ८२४ रुपयांची घट झाली. यामुळे एकाच दिवसात सोने ३०९० रुपयांनी उतरले. आज मंगळवारी पुन्हा किंमती कमी होण्याची ग्राहकांची अपेक्षा आहे.

आताचे दर तपासून घ्या?
दरम्यान कालच्या घसरणीनंतर आज मंगळवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ८५९८६ रुपये प्रति तोळा इतका आहे. तर २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ९३८०० (जीएसटीसह ९६,६१४) रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ९७००० रुपये इतका आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment