जळगाव जिल्हाजळगाव शहरसामाजिक

Jalgaon Ganesh Utsav : पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आता बाप्पाची मूर्तीही महागली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । Jalgaon Ganesh Utsav । यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नाहीत. तब्बल दोन वर्षांनी जळगाव शहरांमध्ये नागरिक मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करणार आहेत. न मास्क लावायच टेन्शन ना सोशल डिस्टन्स ठेवण्याच टेन्शन अशावेळी गणेशोत्सव धुमधडाक्यात पार पडणार यात शंका नाही. मात्र यंदा गणेश मूर्तींचे दर तब्बल १० टक्क्यांनी वाढले आहेत.

गेल्या दोन वर्षापासून गणेश उत्सवावर निर्बंध होते. मात्र ते आता नसणारेत. अशावेळी उत्सवाची रंगत वाढणार यात काही शंका नाही मात्र यंदा गणेश मूर्तींचे दर वाढले आहेत.अशावेळी जरी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे दर वाढले असले तरी त्याच्या खपावर कोणताही परिणाम झाल्या नसल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.

जळगाव शहरात राजस्थानमधून शाडूची माती मागवण्यात येते. याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिस देखील विविध ठिकाणी मागवण्यात येतो. त्याची निर्मिती जळगाव जिल्ह्यात होत नाही. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल दरवाढ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेट्रोल तब्बल 12 टक्क्याने वाढले आहे. म्हणजेच गेल्या गणपतीच्या आसपास पेट्रोलचे दर हे शंभर रुपयाच्या आसपास होते. तर यंदा ते ११०, ११२ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. याचा फटका श्रींच्या मूर्तीच्या दरामध्ये देखील पाहायला मिळत आहे. यामुळेच गणपती बाप्पाच्या मूर्तींचा भाव तब्बल दहा टक्क्यांनी वाढला आहे.

मूर्तींचे दर वाढले तरी त्याचा खरेदीवर कोणताही परिणाम होणार नाही. वर्षातून एकवेळा साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात खर्चाचा विचार न करता आतापासून मूर्ती बुकिंगला प्रतिसाद मिळत आहे.
रमेश बारी, मूर्तिकार , शिरसोली

Related Articles

Back to top button