धक्कादायक ! लाडकी बहीण योजनेचा जळगाव जि.प.च्या कर्मचाऱ्यांसह एका ग्रामसेवकाने घेतला लाभ

ऑगस्ट 22, 2025 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२५ । राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबद्दल दररोज नवीन माहिती येत आहे. राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेतील लाभार्थीची फेरछाननी सुरु केल्यामुळे बोगस लाभार्थीची माहिती उघडकीस येत आहे.

zp ladki bahin

अशातच राज्यातील १ हजार १८३ जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असून यामध्ये १७ पुरुष कर्मचारीही समाविष्ट आहे. त्यात जळगाव जि.प.च्या ७ महिला कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील एका पुरुष ग्रामसेवकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रामसेवकाला ६५ हजार रुपये दरमहा वेतन मिळत असल्याचं समोर आलं असून तरी देखील लाडकी बहीण योजनेच्या मिळणाऱ्या १५०० रुपयावर डल्ला मारला आहे. दरम्यान नियमानुसार या सर्वांवर शिस्तभंग कारवाई तसेच लाभ घेतलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.

महिला व बालविकास विभागाकडून दोन दिवसापूर्वी राज्यातील विविध जिल्हा परिषदेतील ११८३ कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्या सर्व महिला असतील, असा अंदाज होता; पण यादीची छाननी केल्यानंतर त्यात तब्बल १७ पुरूष कर्मचाऱ्यांची नावे देखील असल्याचे समोर आले आहे.

शासनाने दिलेल्या यादीप्रमाणे जळगाव जिल्हा परिषदेच्या सात कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये जळगावातील पुरूष कर्मचारी मुक्ताईनगर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आहे. एकनाथ चुडामण कोळी असे त्याचे नाव असून त्याला सध्या दरमहा ६५ हजार रुपये पगार असल्याचे सांगण्यात आले. तसेच जळगाव जि.प.च्यामहिला कर्मचाऱ्यांनीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले. नियमानुसार या सर्वांवर शिस्तभंग कारवाई तसेच लाभ घेतलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सिओंनी दिली आहे..

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now