⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव दूध संघ निवडणूक : नेत्यांच्या लढाईत मतदारांची चंगळ

जळगाव दूध संघ निवडणूक : नेत्यांच्या लढाईत मतदारांची चंगळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज |६ डिसेंबर २०२२ | जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुक आता चांगलीच रंगताना दिसत आहे. कारण आमने सामने असलेल्या दोन्ही पॅनलतर्फे एकमेकांवर चांगल्याच आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.याच बरोबर तालुकानिहाय मेळावे आणि सहली यामुळे मतदारांची चांगलीच चंगळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या मदनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतांना प्रचार चांगलाच रंगला आहे. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार’ व मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी’ पॅनलचा जोरदार प्रचार सुरू आहे. खडसे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनलतर्फे डबघाईस गेलेला दूध संघ चांगल्या अवस्थेत कसा आणला आहे, याची माहिती देण्यात येत आहे. संघ डबघाईस जाण्यास जबाबदार कोण? असा सवाल ‘शेतकरी’ पॅनल विचारात आहे.

मतदारांसाठी ‘सहली’चे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आहे. मतदारांची संख्या अत्यंत कमी असल्याने जेवढे मतदार येत असतील, त्यांना ‘सहल’ घडवून आणण्याचा दोन्ही गटांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नेत्यांच्या लढाईत मतदारांची चंगळ होत असल्याचे म्हटले जात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह