जळगाव जिल्ह्याला अजून एक मंत्रीपद मिळणार – आमदार चिमणराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । जळगाव जिल्ह्याला आतापर्यंत तीन मंत्रीपदं मिळाली आहेत. मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आणि मंत्री अनिल पाटील असे जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांची नावे आहेत. अशातच जळगाव जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात अजून एक मंत्रीपद मिळतं का? याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे.(CHIMANRAO PATIL MLA)
यातच जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या अजून एक आमदाराला मंत्रिपद मिळेल अशी चर्चा महिनाभरापासून रंगली होती. अशातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अमळनेरचे आमदार अनिल पाटील हे मंत्री झाले. यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांची मंत्रिपदाची संधी हुकते की काय? असे चित्र समोर उभे राहिले आहे.
जळगाव जिल्ह्याने एकनाथ शिंदे यांना उठाव करताना प्रचंड बळ दिले होते. पाचही आमदार हे एकनाथ शिंदे सोबत गेले होते. यामुळे जळगाव जिल्ह्याला दोन मंत्रीपदं मिळतील असे म्हटले जात होते. मात्र ऐनवेळेस उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याने सगळाच गोंधळ उडाला आहे.
मात्र याबाबत आमदार चिमणराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्याला अजून एक मंत्रीपद मिळेल आणि शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिपद मिळेल असा माझा विश्वास आहे. यामुळे आता जळगाव जिल्ह्याला अजून एक मंत्रिपद मिळतं का? आणि ते शिवसेनेचे आमदारांना मिळतं का? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.