जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२५ । सध्या मान्सून पावसाच्या परतीला सुरुवात झाली आहे. त्यातच समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील चार दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यावर देखील पावसाचं सावट कायम असून हवामान खात्यानं आजपासून दोन दिवस विजा, मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान रात्री जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यात पाचोरा शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होत असल्याने संपूर्ण शहर जलमय झाले आहे. शहरातील नदी-नद्यांना पूर आलाय. आधीच गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनावरांच आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे पिकांची माती झाली असून शेतकरी हवालदिल झाला. यातच आता उरलं सुरले पीकही हातु जाण्याची शक्यता आहे.

कारण हवामान खात्यानं राज्यात आगामी चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात आजपासून आगामी दोन दिवस विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आज २२ सप्टेंबर रोजी या जिल्ह्यांना अलर्ट –
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सातारा घाट, सातारा, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली
२३ सप्टेंबर २०२५
यलो अलर्ट –
धुळे, जळगाव, नाशिक घाट, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सातारा घाट, सातारा, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली







