जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२१ । जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व वाढत असून आपला गड आणखी मजबूत करण्यासाठी शिवसेनेने संघटनेत काही फेरबदल केले आहेत. जळगाव लोकसभा जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी गुलाबराव वाघ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण व अंमळनेर जिल्हा प्रमुख पदी विष्णू भंगाळे तर एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव जिल्हा प्रमुख पदी डॉ.हर्षल माने यांनी नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्हा शिवसेनेत फेरबदल, विष्णू भंगाळे, डॉ.हर्षल माने जिल्हाप्रमुख
Published On: जून 3, 2021 8:23 am

---Advertisement---