---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली पुन्हा खळबळजनक घटना ; नेमकी काय आहे वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । मुलाचा खून करणार्‍या आरोपींना थेट जळगाव न्यायालयाच्या आवरात गोळीबार करून संपविण्याचा प्रयत्नात असलेल्या बापाला काल सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्हा न्यायालयात खळबळजनक घटना घडलीय. खुन खटल्यातील जामीना वरील संशयित आरोपी सोबत असलेल्या तरुणाकडे चॉपर आढळून आल्याने खळबळ उडाली. चंद्रकांत राजकुमार शर्मा (वय-२६ रा. कांचन नगर जळगाव) असे चॉपर आढळून आलेल्या तरुणाचे नाव असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत संभाव्य धोका टाळण्यात यश मिळवले आहे.

jalgaon court 1 jpg webp webp

नेमकं प्रकरण काय?
सविस्तर वृत्त असे की, माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश सपकाळे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून लाडू गँगने हल्ला करून धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. या खून खटल्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा न्यायालयामध्ये तारखेवर हजर केले होते. या ठिकाणी संशयित आरोपींना भेटण्यासाठी काही तरुणांनी गर्दी केली होती. याच वेळेला एका तरुणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

---Advertisement---

त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाव घेत संबंधित तरुणावर कारवाई करण्यात यश मिळवले. चंद्रकांत शर्मा या तरुणाकडे चॉपर आढळल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात देण्यात आले. जळगाव शहर पोलीस स्थानकातील गजानन बडगुजर, एलसीबीचे प्रीतम पाटील, विजय पाटील, राजू मेढे, संजय शिवरकर, संतोष मायकल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---