जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । कोरोनामुक्तकडे वाटचाल करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात अचानक कोरोनाने पुन्हा डोख वर काढल्याने बाधीतांच्या ॲक्टीव रुग्णांची संख्येने शिखर गाठला आहे. दरम्यान, आगामी आठ ते दहा दिवसात हा शिखर खाली येण्यास सुरवात होईल. असे असले तरी जिल्हा प्रशासन अधिक सतर्कता बाळगणार आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सीजन बेडची कमतरता जाणवत होती. तीही आता नाही. ऑक्सीजन बेड पुरेसे आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार उपस्थित होते.
जिल्हा आरेाग्य यंत्रणेकडे ऑक्सीजनचे पुरेसे बेड नव्हते. मात्र आपण मोहाडीत महिला रुग्णालयात पाचशे बेडचे हॉस्पीटल सुरू केले आहे. त्यात शंभर बेड ऑक्सीजनचे तर दोनशे बेड सीसीसी सेंटरमध्ये आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोणाला ऑक्सीजनची गरज पडली तर त्यांना या रुग्णालयात शिफ्ट केले जाते. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांना ऑक्सीजन लागतो. रोज ४०-४५ टन ऑक्सीजनची गरज असते. आपली कॅपीसिटी ५० टन ऑक्सीजन साठविण्याची आहे. यामुळेच आपण जिल्ह्यात तयार होणारा ऑक्सीजन केवळ वैद्यकीय कामांसाठी राखून ठेवण्याचे सांगितले आहे. सोबतच रुग्णांना विनाकारण ऑक्सीजन लावला जातो. तो कमी करण्यास सांगितले आहे. गरज असेल तरच ऑक्सीजन लावा. ज्यांचे सॅच्यूरेशन ९४ पर्यंत आहे अशांनाही ऑक्सीजन सुरूच असतो, हे चूकीचे आहे. यामुळे गरज असलेल्यांना ऑक्सीजन देण्याचे आदेश आरेाग्य यंत्रणेसह खासगी डॉक्टरांना दिले आहे. भविष्यात ऑक्सीजनची टंचाई जाणवू नये यासाठी आतापासूनच काळजी घेत ऑक्सीजन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या रेमडेसिव्हरचे उत्पादन घटल्याने त्याची टंचाई आहे. असे असताना खासगी डॉक्टर कोणत्याही रुग्णाला ‘रेमडेसिव्हर’ लावतात. यामुळे सर्व खासगी डॉक्टरांना रेमडेसिव्हरचा वापर गरजू रुग्णांसाठीच करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. आता रेमडेसिव्हर रुग्णांच्या नातेवाईकांना लिहून न देता डॉक्टरांनीच त्यांच्या मेडीकलमधून द्यावे. त्याचे बिल रूग्णाला डिस्चार्ज देताना द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहे. यामुळे रुग्णाला रेमडेसिव्हरसाठी भटकंती करावी लागणार नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिव्हर नियंत्रण कक्षात फोन करून आपली मागणी नोंदविल्याची नोंद करून घ्यावी.