जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंचे (Eknath Khadse) वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघावर खडसेंना शह देत शिंदे फडणवीस सरकारने प्रशासकीय मंडळाची नेमणूक केली. त्यामुळे जळगावात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथराव खडसे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच गिरीश महाजन यांच्या जवळचे अरविंद देशमुख यांनी मंदाकिनी एकनाथ खडसे व खडसे गटाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.हे प्रकरण नवे असतानाच आता जिल्हा सहकारी दूध संघाने अजून एक मोठा निर्णय घेत मोठा धक्काच दिलायं.
जळगाव जिल्हा दूध संघातील संचालक मंडळाने मंगळवारी दूध उत्पादकांना 6 कोटींची अदायकी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रशासकीय मंडळाकडून दूध संघातील अतिरिक्त 200 कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याची तयारी सुरू केलीयं. याबाबत ऑडिट करून दोन दिवसांच्या आत या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून घेण्याचे आदेश मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिले आहेत.
मंदाकिनी खडसे यांच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयाला राजकीय गोटात एकप्रकारे धक्काच मानला जातोयं. मात्र, प्रशासकीय मंडळाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे. दरम्यान, आता मंदाकिनी खडसे व खडसे समर्थक पुढचा निर्णय काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.