⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावात उपमहापौरांच्या पुढाकाराने प्रभाग १० मध्ये डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ

जळगावात उपमहापौरांच्या पुढाकाराने प्रभाग १० मध्ये डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या विशेष पुढाकाराने शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील गट क्रमांक १७४च्या परिसरात आजपासून डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील बर्‍याचशा भागांमध्ये अमृत योजनेमुळे रस्त्यांची खराब अवस्था झालेली आहे. तर आता काही भागांमध्ये अमृत योजनेचे काम पूर्णत्वाकडे आल्याने तेथील रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील गट क्रमांक १७४ या भागात देखील अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यामुळे या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नांनी नागरी दलीत वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेले हे काम येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होणार असून यामुळे या परिसरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.

यांची होती उपस्थिती

आज महापौर सौ. जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांमध्ये नगरसेवक शफी शेख, सुरेश सोनवणे, जाकीर पठाण, अभियंता मिलींद जगताप, अजय देशमुख, अतुल बारी, दीपक पवार, नितीन पाटील, नीरज राजपूत, पंकज पाटील, योगराज पाटील, स्वप्नील पाटील, चेतन बारी, शुभम सोनवणे, धनराज गोसावी, निलेश गोसावी यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.