कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या 1 लाख 13 हजार 704 रुग्णांपैकी 1 लाख 758 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात 10 हजार 930 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 2 हजार 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.61 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्युदर 1.77 टक्क्यांपर्यत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेवर उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 8 लाख 52 हजार 473 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 13 हजार 704 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 7 लाख 36 हजार 987 अहवाल निगेटिव्ह आले असून सध्या अवघे 112 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही 10 टक्क्यांपर्यत खाली आला आहे. जिल्ह्यात 6 हजार 325 व्यक्ति होम क्वारंटाईन असून 670 व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 10 हजार 930 रुग्णांपैकी 7 हजार 531 रुग्ण लक्षणे नसलेले तर 3 हजार 3399 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण
जळगाव शहर-2198, जळगाव ग्रामीण-391, भुसावळ-1236, अमळनेर-495, चोपडा-877, पाचोरा-440, भडगाव-188, धरणगाव-447, यावल-471, एरंडोल-627, जामनेर-857, रावेर-920, पारोळा-306, चाळीसगाव-432, मुक्ताईनगर-637, बोदवड-303 व इतर जिल्ह्यातील-105 असे एकूण 10 हजार 930 रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तालुकानिहाय एकूण मृत्यु
जळगाव शहर-479, जळगाव ग्रामीण-109, भुसावळ-276, अमळनेर-128, चोपडा-147, पाचोरा-98, भडगाव-56, धरणगाव-94, यावल-103, एरंडोल-77, जामनेर-106, रावेर-132, पारोळा-34, चाळीसगाव-101, मुक्ताईनगर-49, बोदवड-27 असे एकूण 2 हजार 16 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात मृत्यु झाला आहे.
तालुकानिहाय बरे झालेले रुग्ण
जळगाव शहर-26358, जळगाव ग्रामीण-3962, भुसावळ-8444, अमळनेर-6955, चोपडा-11577, पाचोरा-3146, भडगाव-2928, धरणगाव-4154, यावल-3169, एरंडोल-4631, जामनेर-6319, रावेर-3528, पारोळा-3736, चाळीसगाव-6311, मुक्ताईनगर-3030, बोदवड-1743 व इतर जिल्ह्यातील-767 असे एकूण 1 लाख 758 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.