लाच भोवली ! जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात

जुलै 23, 2025 8:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२५ । लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या अभिलेख शाखेतील सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांसह खाजगी इसमास तक्रारदाराकडून २ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

lach jpg webp

नेमका प्रकार काय?

तक्रारदाराने आपल्या गावातील अतिक्रमण प्रकरणातील कागदपत्रांच्या प्रती मिळवण्यासाठी 16 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर तो वेळोवेळी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकारी आणि खाजगी व्यक्तींच्या संपर्कात होता. या दरम्यान आरोपी क्र. 2 संजय प्रभाकर दलाल (वय 58) यांनी “शासकीय फी व झेरॉक्स 1400/- रुपये व आमचे 600/- रुपये” असे सांगून एकूण 2000/- रुपयांची लाच मागितली. आरोपी क्र. 1 प्रशांत सुभाष ठाकूर (वय 49), सहाय्यक महसूल अधिकारी, यांनी लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले.

तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली आणि 23 जुलै 2025 रोजी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले. तपासात 880/- रुपये शासकीय शुल्क आणि 1120/- रुपये लाच रक्कम असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now