---Advertisement---

उद्यापासून जळगावातील १४ व्यापारी संकुलने बेमुदत बंद ; ‘ही’ मार्केट असणार बंद

---Advertisement---

 

jalgaon closed agitation fourteen markets against

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । महापालिकेच्या १४ व्यापारी संकुलातील गाळेधारक शुक्रवार (ता. ५)पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महापालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिला. 

---Advertisement---

 

दरम्यान, महापालिका उपायुक्तांनी पुन्हा मार्केटला भेट दिली. त्यांनी गाळेधारकांना पैसे भरण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. डॉ. सोनवणे म्हणाले, की संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त प्रशांत पाटील यांनी बोलविले. गाळेप्रश्नी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अधिवेशनानंतर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत कारवाई करू नये, असे संघटनेतर्फे आयुक्तांना सांगण्यात आले होते. मात्र, मनपा प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने १४ मार्केटमधील दुकाने बंद करून दुकानदार आंदोलन करणार आहेत. त्या वेळी मनपाचे अधिकारी कारवाईसाठी आल्यास काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.

राज्यात एकूण २७ महापालिकेचे मार्केट आहेत. त्यातील सर्व मार्केटमधील गाळेधारकांचे नूतनीकरण व जुने भाडे व इतर करांचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, जळगाव मनपाद्वारे तब्बल २५० पट दंड लावला आहे. त्यामुळे प्रत्येक गाळेधारक ही रक्कम भरू शकत नाही. सर्वांना सवलती देतात. मग गाळेधारकांवरच सक्ती का, असा प्रश्नही या वेळी उपस्थित केला.

 

शहरातील महापालिकेच्या मालकीची अविकसित आणि अव्यवसायिक १४ मार्केट शुक्रवारपासून बेमुदत बंद राहणार आहेत. त्यात रामलाल चौबे मार्केट, भोईटे मार्केट, जुने बी. जे. मार्केट, डॉ. आंबेडकर मार्केट, वालेचा मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, शिवाजीनगर दवाखान्याजवळील दुकाने, महात्मा गांधी मार्केट, भास्कर मार्केट, गेंदालाल मिल कॉम्प्लेक्स, श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानजवळील मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, जुने शाहू मार्केट, धर्मशाळा मार्केटचा समावेश आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---