---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

ठरलं तर ! ‘या’ तारखेपासून धावणार जळगाव शहरात ई-बस; असे निश्चित झाले मार्ग?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२५ । जळगाव शहर महापालिकेकडून ई-बस सेवा सुरु होणार मात्र ही बस सेवा कधी सुरु होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. अशातच ई-बस सेवेला १५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

e bus

दीड वर्षांपूर्वी शहरात ई-बस सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने बसेसचे मार्ग ठरवून त्यावर गुरुवारी आमदार सुरेश भोळे व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीतील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील २३ मार्गांवर २३१ किलोमीटर अंतरावर ५० बसेसचा प्रवास होईल. येत्या आठवडाभरात ३१६ थांबे निश्चित केले जाणार असून, पंधरवड्यात टप्यानिहाय भाडे ठरेल.

---Advertisement---

३० जुलैपर्यंत बस डेपो उभारणीचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट निश्चत करण्यात आल्यामुळे १५ ऑगस्ट रोजी नवीन बसेस शहरात धावतील, असे नियोजन आखल्याची माहिती आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी बैठकीत दिली.

जेबीएफ इकोलाइफ या कंपनीतर्फे या बसेसचा पुरवठा व संचलन केले जाणार आहे. ५० बसेससाठी डेपो व चार्जिंग स्टेशनचे काम शिवाजी उद्यानाला लागून असलेल्या जागेत सुरू आहे. आतापर्यंत डेपोचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. १२ मीटरच्या २४, ९ मीटरच्या ६ व ७मीटरच्या २० अशा ५० ई-बस केंद्र शासनाकडून उपलब्ध केल्या जातील.

असे निश्चित झाले मार्ग
बसचा मुख्य मार्ग आणि एकूण बस थांबे
जुने बसस्थानक-विद्यापीठ – १७
जुने बसस्थानक पाळधी – १८
जुने बसस्थानक-जळगाव खुर्द – १४
जुने बसस्वानक-म्हसावद- १८
जुने बसस्थानक उमाळा फाटा – १५
जुने बसस्थानक-कानळदा – १२
जुने बसस्थानक-विदगाव – १५
जुने बसस्थानक शेळगाव- १२
जुने बसस्थानक हरीविठ्ठलनगर -१३
जुने बसस्थानक मोहाडी – १५
जुने बसस्थानक पिंप्राळा हुडको- २१
जुने बसस्थानक कोल्हे हिल्स – १३
एकनाथनगर मेहरूण पाटचारी – १२
जुने बसस्थानक निमखेडी – १७
जुने बसस्थानक-गणेश कॉलनी – ०७
शिरसोली नाका-जुने बसस्थानक – ०६
जुने बसस्थानक शिरसोली – १५
जुने बसस्थानक धानवड – १६
एकनायनगर-जुने बसस्थानक – ११
एकनाथनगर -चिंचोली गाव – १०
एमआयडीसी-अजिंठा चौफुली – १८
जुने बसस्थानक सावखेडा – २०
जुने बसस्थानक-खंडेरावनगर – २१

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment