जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण होऊन प्रगतिपथावर आहेत. त्यासाठी आमदार सुरेश भोळे यांच्याकडून निधी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत शहरातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव वर्षा देशमुख यांनी दि.३ ऑक्टोबर रोजी काढलेले आहेत.
या निधीतून दलित वस्तीतील रस्ते कॉक्रिटीकरण, गटारी बांधकाम, खुला भूखंड यासह विविध कामांसाठी हा निधी वापरता येणार आहे. यासह दलित वस्तीतील अन्य कामांचा यात समावेश राहणार आहे. निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांचे आमदार भोळे यांनी आभार मानले आहे.