---Advertisement---
कोरोना जळगाव शहर

जळगाव बस स्थानकावर आता प्रत्येक प्रवाशाची होणार अँटीजन चाचणी

corona patinet
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । जिल्ह्यासह शहरात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर महापौर जयश्री महाजन व उप महापौर कुलभूषण पाटील यांनी काल सोमवारी जळगावतील नवीन बस स्थानकाची पाहणी करून, स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटीजन चाचणी करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बस स्थानकात अँटीजन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले असून, पहिल्या दिवशी ७० प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

corona patinet

आज मंगळवारपासून बस स्थानकात सकाळी आठ पासून सायंकाळी सहा पर्यंत स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी मनपा आरोग्य विभागातर्फे दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चाचणीत जे प्रवासी पॉझिटिव्ह आढळून येतील. त्यांना लागलीच कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

---Advertisement---

सध्या संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाहेरील मार्गावरची सेवा बंद आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या इतरत्र ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची स्थानकात ये-जा सुरूच असते. त्यामुळे खबरदारी म्हणून बस स्थानकातही येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटीजन चाचणी करण्याबाबत महापौर जयश्री महाज यांनी मनपा आरोग्य विभागाला सूचना केल्या. तसेच यावेळी त्यांनी सोमवारी सायंकाळी नविन बस स्थानकाला भेट देऊन, सध्या सुरू असलेल्या सेवेची व प्रवाशांची माहिती घेतली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---