जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२३ । मागील गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात गंभीर गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. अशातच आणखी एका गुन्हेगारावर एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे. गणेश उर्फ नाना शांताराम कोळी (वय-३७) असं स्थानबध्द केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून त्याला अटक करून ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात गुन्हेगार गणेश कोळी हा रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. तरी देखील त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गणेश कोळी याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्यात यावी असा अहवाल जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता.
त्यानुसार अहवालाचे अवलोकन करून पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमपीडीए कायद्यांर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश काढले. त्यानुसार रामानंद नगर पोलीसांना त्याला अटक करून ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.