जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतानाचे दिसून येतेय. जळगावात आणखी एकाला ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. अक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून एका तरूणाला ८० हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील अक्सा नगरमध्ये राहणाऱ्या सैय्यद वसीम आबिद अली (वय-३५) या तरुणाला एका नंबरवरून अक्सीस बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला ८ हजार रूपयांचे कूपन लागल्याचे सांगितले. यासाठी तुम्हाला आठ हजार आगोदर भरावे लागतील असे सांगितल्यावर सैय्यद वसीम यांनी त्यांच्या खात्यावर ८ हजार रूपये ऑनलाईन टाकेल. काही दिवसानंतर सैय्यद वसीम यांनी एका पोस्टाद्वारे प्रत्येकी दोन हजार रूपयांचे दोन कूपन व एक घड्याळ आले.
दरम्यान काल बुधवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एका नंबरवरून फोन आला की अक्सेस बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्हा कुणीतरी कुपन पाठवून फसवणूक केल्याचे सांगून इतरांच्या तक्रारी आल्या आहे. फसवणूक झालेल्या लोकांना त्यांचे पैसे परत करत असून तुमचा क्रेडीट कार्डचा नंबर सांगा असे सांगितले. त्यावर सैय्यद वसीम यांनी १६ अंकी नंबर सांगितला असता त्यांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यातून ५० हजार आणि ३० हजार रूपये वर्ग झाल्याचे दिसून आले.
सदर फसवणूक झाल्याची बाब लक्ष्यात आल्यानंतर सैय्यद वसीम यांनी एमआयडीसी पोलीसात घेत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतूल वंजारी करीत आहे