⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगावकरांनो काळजी घ्या, आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता आजपासून जळगावसह राज्यातील विविध भागात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे. जिल्ह्यात तापमानाचा पार वाढणार असल्याची शक्यता जिल्ह्या हवामान विभागाने वर्तवली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्माघातापासून बचाव व उपायासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

उष्णतेच्या लाटेत उष्माघाताचा घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन व आरोग्य विभागात देखील सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अभिजित राऊत यांनी आज दिल्या आहेत. तर लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना देखील उष्णतेच्या लाटेत उपायोजना राबवण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे.

यामुळे पुढील काही दिवस उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वारंवार पाणी पिणे, अनावश्यकपणे घराच्या बाहेर न पडणे, लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे असून जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात सर्व डॉक्टरांना सतर्क राहण्याचे सूचनाही देण्यात आल्या असून सर्वांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहेत.

29 मार्च रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

30 मार्च रोजी 11 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट
हवामान खात्याकडून 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

31 मार्च रोजी या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट
31 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट दिला आहे.

दरम्यान, संपूर्ण पश्चिम विदर्भात तापमान सरासरीच्या 4.5 अंश ते 6.4 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 31 मार्च रोजी देखील राज्यात जैसे थे परिस्थिती कायम राहणार आहे. चंद्रपुरात तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.