जाखेटे आणि बच्छाव शोरूमच्या जागेमुळे अडचणीत येण्याची शक्यता
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बाबत ॲड.विजय भास्करराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत गेल्या काही दिवसाला आपण त्या अनधिकृत गाळ्यांसंदर्भात तक्रार केली गेली असल्याचे सांगितले. दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी बाजार समितीने अजिंठा चौफुली येथील जागा जाखेटे व बच्छाव यांना चक्क विक्री केली असून आज त्याठिकाणी वाहनांचे मोठमोठे शोरूम उभे आहे. बाजार समितीला जागा विक्री करता येत नसून याबाबत स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे ॲड.पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत ॲड.विजय भास्कराव पाटील यांनी सांगितले की, अजिंठा चौफुली येथील प्रकाश जाखेटे यांचे होंडा शोरूम व प्रा.डी डी बच्छाव यांचे सातपुडा ऑटोमोबाइल शोरूम याला गेल्या पंधरा वर्षांआधी याच मार्केट कमिटीने सदर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीची असताना तिला विकत देत त्यांच्या नावावर करून दिलेली आहे. ॲकवायर झालेली जागा कायद्याने कोणालाही विकता येत नाही एवढेच नाही तर खरेदी खत करून विकून दिली असल्याचे देखील म्हणाले. त्यावेळी सदर जागा फक्त ३५ लाखात त्यांनी घेतल्या असून याबाबतची संपूर्ण कागदपत्र गठ्ठे आपल्याकडे उपलब्ध असून वेळ आल्यावर त्यावर देखील आपण तक्रार अर्ज देणार असून सविस्तर पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ असे देखील यावेळी ॲड.विजय पाटील म्हणाले आहेत.
ॲड.पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटमुळे दोन्ही शोरूम अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या काही दिवसात याबाबत अधिक माहिती आपल्यासमोर येणारच आहे.