जळगाव जिल्हाजळगाव शहर
जयप्रकाश रामानंद यांची बदली रद्द करण्यात यावी – प्रशांत नाईक
जळगाव लाईव्ह न्युज | २८ ऑगस्ट २०२१ | जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामायण यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
त्यात ते म्हटले आहेत की डॉ.रामानंद यांच्या कार्यकाळात जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची ‘न भूतो न भविष्यते’ अशी प्रगती झाली आहे. त्यांच्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावला आहे. खुद्द गुलाबराव पाटील एक वेळेस असं म्हणाले होते की ‘मंत्रीमंडळात माझी कॉलर ताठ झाली’ आहे. म्हणून राज्य शिक्षण व औषधी द्रव्य विभागाशी संवाद साधून रामानंद यांची बदली रद्द करण्यात यावी.