जळगाव शहर

जैन इरिगेशनला मिळाले सोलापूरच्या लाल डाळिंब निर्मितीचे अधिकार, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राशी सामंजस्य करार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड जळगाव आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यामध्ये ‘डाळींबाच्या सोलापूर लाल’ या त्यांच्या संशोधित व हायब्रीड वाणाची टिश्यूकल्चरच्या सहाय्याने निर्मिती करून देशात प्रसार करण्यासाठी नुकताच सामंजस्य करार झाला.

डाळिंब केंद्राचे संचालक डॉ. आर. ए. मराठे जैन टिशू कल्चरचे डॉ. अनिल पाटील व के. बी. पाटील यांच्या करारावर स्वाक्षरी आहेत. डाळिंबाची सोलापूर लाल ही जात किंवा वाण पोषण दृष्टीने उत्तम असून त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते, उष्णतेचा परिणाम कमी होतो. जास्त तापमानात सुद्धा दाण्यांचा रंग चांगला असतो. फळांचा रंग, गंध तसेच आतील दाण्यांचा लाल रंग व उत्तम चव तसेच प्रोटीन, झिंक आणि ‘क’ जीवन सत्वाचे प्रमाण अधिक आहे. ही जात भगव्याच्या तुलनेत 15 ते 20 दिवस लवकर येते. सर्वच दृष्टीने सोलापूर लाल हे डाळींबाचे वाण उजवे ठरलेले आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक त्याकडे वळत आहेत. प्रक्रियेसाठी सुद्धा चांगली जात आहे. जैन इरिगेशनचे टिश्युकल्चर डाळिंबा मध्ये जगात नावलौकीक आहे. कंपनी दरवर्षी 70 लाख डाळिंबाचे रोपे निर्माण करते. आता सोलापुर लाल निर्मातीचे अधिकार मिळाले त्या सोलापूर लाल जातीचे क्षेत्र वाढेल.

यावेळी परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.डी.पी. वासकर, केंद्राच्या प्रधान शास्त्रज्ञ डॉ. जोत्सना शर्मा, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर चांदणे, डॉ. एन.व्ही सिंग, डॉ. गायकवाड, डॉ. मल्लिकार्जुन, डॉ. प्रकाश कुलकर्णी, तुषार जाधव, डॉ एस.व्ही. जजीनवार डॉ. मंजुनाथ बागलकोट, कृषी विद्यापीठ हे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button