जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । बाळासाहेब ठाकरे यांचे थोरले सुपुत्र जयदेव बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला दसरा मेळाव्यामध्ये समर्थन दिले.यावेळी ते म्हणाले कि, एकनाथ शिंदे हे माझे आवडते नेते आहेत. एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. एकनाथ शिंदे हे कष्टकऱ्यांचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत नेहमी रहा त्यांना एकट पाडू नका. एकनाथांना ‘एकटनाथ’ करू नका.
मुंबईला दरवर्षी दसऱ्याला होणारा शिवसेनेचा मेळावा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. यंदा शिवसेनेत फूट पडली असून दोन दसरा मेळावे पाहायला मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे शाब्दिक युद्ध रंगणार हे नक्की होत. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे थोरले सुपुत्र जयदेव बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याने सगळ्यांनाच धक्का बसला.
एकनाथ शिंदें LIVE :
याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणाताई गडकरी यांनी देखील यावेळी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. या दोन्हीही व्यक्तींनी एकनाथ शिंदे यांना सभेमध्ये समर्थन दिल्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे.