जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । महाराष्ट्र राज्यस्तरीय गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनच्या यावल तालुकाध्यक्षपदी, शहरातील सोने चांदीचे व्यापारी जगदीश रत्नाकर कवडीवाले यांची नुकतिच नियुक्ती करण्यात आली आहे.
सोने, चांदी व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव आणि यावल शहरातील अनेक बँकांचे सोने तारण व्हॅल्युएशनचा त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के, संघटक भैय्याभाऊ भामरे यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातील हॉटेलमध्येच सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी छापा टाकताच..
- समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आमदार राजूमामा भोळे
- खातेवाटपनंतर मंत्री गुलाबराव पाटीलांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले..
- प्रवाशांसाठी खुशखबर! जळगाव, भुसावळमार्गे धावणार ‘या’ नवीन रेल्वे गाड्या
- जळगावातील तापमानाचा पारा वाढला, खान्देशात पुढचे तीन दिवस असं राहणार तापमान?