जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२१ । राज्यात काही भागात पुढील आठवड्यात पुन्हा अवकाळीचा शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. बदलत्या हवामानामुळे गेल्या काही दिवसापूर्वी थंडी वाढली होती. परंतु नंतर थंडीची तीव्रता कमी झाली. मात्र येत्या रविवारनंतर अधिक वाढणार आहे. शनिवारपासूनच उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांचा वेग ताशी १७ किमीपर्यंत वाढण्याची शक्यता अाहे. रविवारी किमान तापमान अवघ्या ८ अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात विशेषत: जळगाव जिल्ह्यात बुधवारी किमान तापमान १२.२ अंशांवर हाेते. वाऱ्याचा वेग ताशी ५ ते ६ किलाेमीटर असल्याने दुपारी ३० अंशांपर्यंत वाढलेल्या कमाल तापमानामुळे उन्हाचा चटका जाणवत हाेता. गुरुवारपासून वाऱ्याचा वेग वाढेल. शुक्रवारी ताशी ११ किमी, शनिवारी १३ किमी तर रविवारी वाऱ्याचा वेग ताशी १६ ते १७ किमीपर्यंत वाढू शकताे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रविवारी दिवसाही गारठा जाणवेल.
त्यामुळे कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस ते किमान तापमान ८ अंश सेल्सअसपर्यंत राहणार आहे. दाेन दिवस या वाऱ्यांचा प्रभाव असेल. पुढील आठवड्यात पुन्हा तापमानात वाढ हाेऊन थंडीची तीव्रता कमी हाेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- भुसावळातील खून प्रकरणात 5 संशयित पोलिसांच्या जाळ्यात ; 4 पिस्तूल अन् 3 काडतूस जप्त
- Gold Rate : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव घसरला; खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचा भाव
- आजचे राशिभविष्य १३ जानेवारी २०२४ : आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता, या गोष्टीपासून सावधान राहा..
- धक्कादायक ! महाकुंभला जाणाऱ्या रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
- वरणगाव येथील बनावट पत्त्यावर पाठविण्यात येणारा बायोडिझेलचा टँकर जप्त