⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | नोकरी संधी | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 10वी पाससाठी सरकारी नोकरी मोठी संधी; पगार 69,100 पर्यंत

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 10वी पाससाठी सरकारी नोकरी मोठी संधी; पगार 69,100 पर्यंत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर असून थेट इस्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये तंत्रज्ञ-B पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक उमेदवार ISRO च्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ISRO Recruitment 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 54 पदे भरली जातील.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) तंत्रज्ञ-बी (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक):
शैक्षणिक पात्रता : 
NSLC/SSC पास, NCVT कडून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
2) तंत्रज्ञ-बी (इलेक्ट्रिकल):
शैक्षणिक पात्रता :
 NSLC/SSC पास, NCVT मधून इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
3) तंत्रज्ञ-बी (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक):
शैक्षणिक पात्रता : 
NSLC/SSC पास, NCVT कडून इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
4) तंत्रज्ञ-बी (फोटोग्राफी):
शैक्षणिक पात्रता :
 SSLC/SSC पास, NCVT कडून डिजिटल फोटोग्राफी/फोटोग्राफी ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
5) तंत्रज्ञ-बी (डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर):
शैक्षणिक पात्रता 
: NSLC/SSC पास, NCVT कडून डेस्कटॉप प्रकाशन ऑपरेटर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.

वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावी. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.
अर्ज शुल्क
अर्जाची फी ₹100 आहे. तथापि, सुरुवातीला सर्व उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून प्रति अर्ज ₹ 500 ची एकसमान रक्कम भरावी लागेल.
वेतनश्रेणी : 21700 ते 69,100 पर्यंत पगार या पदांसाठी देण्यात येणार आहे.

याप्रमाणे अर्ज करा
ISRO च्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in ला भेट द्या.
होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
अर्ज भरा.
अर्ज फी भरा.
भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.