जळगाव जिल्हा

तापी नदी आणि जळगांव जिल्ह्यातील जलसिंचनाचा बोजवारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१। तापी नदी ही जळगांव जिल्ह्याला लाभलेलं वरदान आहे, तापी खोरेचे सर्वात अधिक क्षेत्रपळ जळगाव जिल्यात असून तापी नदीची लांबी जवळपास 100किमी आहे.
पण जलसिंचनाचा भाग म्हणून तापी नदीवर एकही मोठं धरण/ बांध आजपर्यंत पूर्ण झालेला नाही. तापी निम्न प्रकल्प पाडळसरे धरण गेले 20 वर्षे काही पूर्ण झालं नाही, त्याची प्रोजेक्ट कॉस्ट 3 पटीने वाढली. धरण आणि बांध नसल्याने भूजल पूर्णभरण होत नाही आणि
केळी व इतर बागायत साठी प्रसिद्ध असलेल्या तापी परिसर भागात भूजल पातळी दिवसेंदिवस खूप खोलवर जाते आहे त्यामुळे याचे दुष्परिणाम बागायत क्षेत्रावर, शेतकऱ्यांवर रोजगारावर पडताना दिसतोय.

जळगांव जिल्ह्यतुन 2-3 वेळेस जलसंपदा, पाटबंधारे, पाणी पुरवठा, असे विविध मंत्रीपदे मिळाली पण आजपर्यंत शेती सिंचनाचा प्रश्न कुणीही मार्गी लावला नाही. जलसिंचनासोबत शहरी/ ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. बांध नसल्याने पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून जाते आणि उन्हाळ्यात तापी नदीत पाणी राहत नाही, तसेच हतनूर धरण ये जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने त्याचा फायदा जलसिंचनाचा खूप कमी होतो.

म्हणून आम्ही कठोरे ता चोपडा चे समस्त शेतकरी नागरिक संपूर्ण जिल्याच्या वतीने महाराष्ट्र सरकारला आणि प्रशासनाला मागणी करतो की कठोरे गावालगत तापी नदीवर बॅरेज किंवा बांध बांधावा तसेच पाडळसरे धरणही लवकरात लवकर पूर्ण करावे..जलसिंचनाचा प्रश्न मार्गी काढावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button