⁠ 
रविवार, जून 16, 2024

बजेट कमी असेल तरी Apple चा फोन घ्यायचाय? iPhone SE4 असणार सर्वात स्वस्त आयफोन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२३ । मोबाइल फोन ही काळाची गरज आहे. त्यामुळेच काळानुसार यात बदल होत गेले. आणि आता स्मार्टफोन शिवाय कोणाचेही पान हलत नाही. त्यातही काही ब्रँडचे फोन असणं ही प्रतिष्ठेची बाब आहे. वन प्लस, ऍपल हे त्यातलेच काही प्रतिष्ठित ब्रँड. हे फोन आपल्याकडे असावेत हे प्रत्येकालाच वाटत असतं. पण त्याच्या किमतीमुळे ते काही सगळ्यांना नेहमीच शक्य होतं असं नाही. तुम्हाला ऍपलचा मोबाईल घ्यायचा असेल तर आता नो टेन्शन. ऍपलचा एक फोन अगदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात मोबाईल फोनमध्ये मोठी क्रांती झाली आहे. हातात असणारा छोटा फोन आता स्मार्ट झाला आहे. रोजच्या जीवनातली अनेक कामे आता फोनवर होऊ लागली आहेत. तर संबंध जग आता एका क्लिक वर येऊन थांबले आहे. अशात आपल्याकडे असणारा फोन हा चांगला असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आयफोन हे सगळ्यांचं स्वप्न असतं.
जगभरात आयफोनला प्रचंड मोठी मागणी आहे. भारतात आयफोन खरेदी करणाऱ्यांची काही कमी नाही. पंरतु, आयफोनची किंमत जास्त असल्याने अनेक जण इच्छा असूनही फोन खरेदी करू शकत नाहीत. आता आयफोन चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. Apple कडून बजेट स्मार्टफोन मार्केटमध्ये आणण्याची तयारी सुरू आहे. हा फोन बजेटमध्ये असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ऍपलचा हा सगळ्यात स्वस्त फोन असणार आहे.
Apple चा नवीन स्मार्टफोन iPhone SE4 असणार आहे. त्यामुळे असा दावा केला जात आहे की, iPhone SE4 सर्वात स्वस्त आयफोन असणार आहे. जर तुम्हाला कमी बजेट मध्ये आयफोन खरेदी करायचा असेल तर iPhone SE4 एक चांगला पर्याय ठरू शकतो.

संभाव्य फीचर्स
IPhone SE 3 ची स्क्रीन साइज ४.७ इंचाची आहे. परंतु, अपकमिंग iPhone SE 4 ची स्क्रीन साइज त्याहीपेक्षा मोठी असण्याची शक्यता आहे. आता 5जी नेटवर्क आल्याने साहजिकच आयफोनमध्ये हेच नेटवर्क असेल. फोनचा रियर कॅमेरा १२ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा १०.०८ मेगापिक्सलचा असू शकतो.

किंमत आणि लाँचिंग डेट
कंपनीकडून iPhone SE4 च्या लाँचिंगचा खुलासा अद्याप अजून करण्यात आला नाही. परंतु, लीक रिपोर्टनुसार, Apple iPhone SE4 ला यावर्षीच सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो. हा फोन ५० हजार रुपयापेक्षा कमी किंमतीत मिळू शकतो.