⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये सहभागी होण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kasuhalya.mahaswayam.gov.in अथवा https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर २० डिसेंबर पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ साठी जिल्हा, विभाग, राज्य व देशपातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे मानांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरीता सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२२ व त्यानंतरचे असणे अनिवार्य आहे.

तसेच, Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Gigital Construction, Industrial Design Technology, Industry ४.०, Information Network Cabling , Mechatronics, Robot System Integration @ Water Technology या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९९९ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस.ग्राऊंड शेजारी, जळगाव येथे प्रत्यक्ष अथवा ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री.रिसे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.